क्लिअरची सीरीज सी अंतर्गत ७५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२१  : भारताच्या फिनटेक (सास) क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी क्लिअरने (पूर्वाश्रमीची क्लिअरटॅक्स) कोरा कॅपिटलच्या नेतृत्वात जागतिक फिनटेक कंपनी स्ट्राइप, अॅल्युआ कॅपिटल, थिंक इन्व्हेस्टमेंट्स आणि इतर विद्यमान गुंतवणूकदारांच्या सहकार्याने आज ७५ दशलक्ष डॉलर्सचा सीरीज सी निधी उभारल्याची घोषणा केली. हा निधी क्लिअरच्या बी२बी पतपुरवठा आणि पेमेंट्सच्या विस्तारीकरणाला वेग देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तारीकरणासाठी वापरला जाणार आहे.       गेल्या १८ महिन्यांत क्लिअरच्या सास प्लॅटफॉर्मने ३०००+ मोठ्या औद्योगिक ग्राहकांची भर घालत पाच पटींची अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. तसेच क्लिअरच्या प्लॅटफॉर्मवर १ दशलक्षापेक्षा जास्त लघु व्यावसायिकांकडून वापरात मोठी वाढ अनुभवण्यात आली आहे. क्लिअरचे प्लॅटफॉर्म आता ४०० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या जीएमव्हीसह (ग्रॉस मर्चंडाइज व्हॅल्यू) भारतातील १०% व्यापारिक चालानांवर (बिझनेस इन्व्हॉयसेस) प्रक्रिया करते.     क्लिअरचे संस्थापक आणि सीईओ अर्चित गु्प्ता म्हणाले, “आम्ही कोरा, स्ट्राइप आणि आमच्या आगामी गुंतवणूकदारांचे सहर्ष स्वागत करतो. उगवत्या बाजारपेठेतील तंत्रज्ञान कंपन्यांसोबत कोराला काम करण्याचा मजबूत अनुभव आहे. स्ट्राइप ही जागतिक तंत्रज्ञान कंपनी इंटरनेटसाठी आर्थिक संरचना उभारण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. दोन्ही कंपन्यांकडून शिकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारत एक भव्य डिजिटायझेशनच्या प्रवासावर आहे. 


 

         इलेक्ट्रॉनिक इन्व्हॉयसिंग, जीएसटी, यूपीआय, स्वस्त मोबाइल इंटरनेट आणि कोविड-१९ मुळे तंत्रज्ञानाचा वेगवान अवलंब या सर्व गतीमान घडामोडींचा एक भाग असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही आमच्या सास प्लॅटफॉर्मचा दुप्पट विस्तार करत आहोत. जेणेकरून व्यवसायांना तारणमुक्त कर्ज आणि पेमेंट्स मिळण्यात मदत होईल. या निधी उभारणीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आमच्या विस्तारीकरणही मोठी मदत होणार आहे.”


        क्लिअरला भारतात प्रामुख्याने क्लिअरटॅक्सचा निर्माता (ग्राहकांसाठीचे डिजिटल टॅक्स व्यासपीठ) म्हणून ओळखले जाते. भारत सरकारकडून जोरदार प्रयत्नांच्या साथीने भारतीय व्यवसायांचे वेगाने डिजिटायझेशन होत आहे. वस्तू आणि सेवा कर संरचनेची पूर्णपणे डिजिटल अंमलबजावणी ई-इन्व्हॉयसिंग बंधनकारक केल्यामुळे आणखीच गती मिळून क्लिअर ही भारताची या क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली सास (सॉफ्टवेअर अॅज सर्व्हिस) सेवा पुरवठादार कंपनी बनली आहे.         क्लिअरने नुकतेच वायबँन्कचे (yBANQ) अधिग्रहण केले आहे. या माध्यमातून कंपनीने बी२बी पेमेंट्समध्ये विस्तार केला आहे. नुकत्याच मिळालेल्या निधीमुळे कंपनीचे पेमेंट्स आणि पतपुरवठा क्षेत्रातील विस्तारीकरण होण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच कंपनीच्या उत्पादन संचाला वेगाने बदलत असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही नेण्यास साह्य मिळणार आहे.         आगामी काही वर्षांत १०,००० पेक्षा मोठ्या कंपन्या आणि १० दशलक्ष लघु व्यवसायांना सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट कंपनीने डोळ्यासमोर ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments