कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण बस सेवा सुरु झाली असून आज सकाळी ५ वाजता पहिली एसटी बस थोरगव्हाणकडे रवाना झाली. सकाळी ५ वाजता कल्याण डेपो येथे बसच्या उदघाटन प्रसंगी रवींद्र कोलते, अनिल चौधरी (नेमाडे) भिवंडी डेपोचे सहकारी यांनी याकामी चांगले सहकार्य केले. या यावेळी भा.ज.पा. डोंबिवली पश्चिम शहर अध्यक्ष प्रदीप चौधरी, समाजसेवक सुधीर वायले यांच्याहस्ते चालक खुशाल सूर्यवंशी व वाहक व्ही.ए. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थोरगव्हाण या गावातील आणि आसपासच्या परिसरातील बरेचसे नागरिक कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात राहतात. या नागरिकांना त्याठिकाणी जाणे सुलभ व्हावे यासाठी येथे एसटी बस सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार थोरगव्हाण येथे कल्याण डेपो मधून प्रवासी बस सुरु करण्यात आली आहे. ही गाडी दररोज सकाळी ५ वाजता कल्याण येथुन निघणार व संध्याकाळी थोरगव्हाण येथे सुमारे ७:३० च्या दरम्यान पोचणार आहे. या बसचा मार्ग कल्याण, नाशिक, मालेगाव,चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, सावदा, थोरगव्हाण असा असणार आहे.या मार्गावरील मार्गस्थ प्रवाशांनी जास्तीत जास्त या सेवेस प्रतिसाद द्यावा व इतर थांब्या वरील प्रवाश्यांना सुद्धा या सेवेचा लाभ घेण्यास उपकृत करावे असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी लेवा प्रागतिक मंडल खजिनदार योगेश कोल्हे, थोरगव्हाण ग्रामपंचायत सदस्या वैशाली बाऊस्कर, लेवा प्रा.मंडल सदस्य तुषार चौधरी, लतीश बाऊस्कर, नरेंद्र पाटीलज्ञानेश्वर पाटील, गणेश चौधरी, राजेंद्र नाले, संदीप नाथ आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments