जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयाचे सुयश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयाने सुयश प्राप्त केले आहे.


          रविवारी रिओ फिटनेस लोकमान्य नगर ठाणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयातीळ खेळाडू माधुरी बोहरे हिने ४३ किलो वजनी गटात सुवर्णपदक, माया तुपसुंदर - रौप्य पदक, सारिका भडकमकर - सुवर्णपदक, विनया म्हात्रे - कांस्यपदक मिळविले आहे. तर हे सर्व खेळाडू महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक रविंद्रनाथ गायकर यांच्याकडे सराव करत आहेत.

Post a Comment

0 Comments