रामनगर प्रभागात शिवसैनिकां कडून स्वच्छता मोहीम

 डोंबिवली ( शंकर जाधव ) दिवाळी सणात आपले घराची साफसफाई करून स्वच्छ केले जाते, त्याचप्रमाणे आपला परिसर, विभाग आणि शहर स्वच केले पाहिजे या उद्देशाने शिवसैनिकांनी रामनगर प्रभागात शिवसैनिकांकडून स्वच्छता मोहीम राबिवली.          कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ, श्रीकांत शिंदे आणि युवा जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या सहकार्याने युवा सेना उपजिल्हाअधिकारी ओंकार तांबे यांच्या प्रयत्नाने रामनगर उपविभागप्रमुख तेजस तुंगारे, शुक्रमानी कवडेकर, सागर सुर्वे यांसह शिवसैनिकांनी रामनगर परिसराची साफसफाई करून स्वच्छ केला.युवासेनेचे हे समाजकार्य पाहून परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments