समाजसेवक अमोल केंद्रे व अश्विनी केंद्रे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

 डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या बदली बाबत आंदोलन करणाऱ्या समाजसेवक श्री अमोल केंद्रे व त्यांच्या पत्नी अश्विनी अमोल केंद्रे यांना   ठाणे जिल्हा तथा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. केंद्रे दाम्पत्याने आंदोलनाकरिता जवानांकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप ठेवत मुंब्रा पोलिसांनी त्यांच्यावर पोलीस अप्रितीची भावना भडकावणे कायदा कलम ३ या अन्वये गुन्हा दाखल केला होता.          या विरुद्ध वकील श्री अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यामार्फत केंद्रे दाम्पत्याने ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरिता अर्ज दाखल केला होता .  याकरिता  बुधवारी ठाणे  जिल्हा व सत्र न्यायालयात अनिरुद्ध कुलकर्णी यांनी युक्तिवाद करत सत्य परिस्थिती न्यायालयासमोर मांडली व केंद्रे दाम्पत्याने कोणताही आर्थिक गैरव्यवहार केला नसल्याचे व हा कायदा केंद्रे दाम्पत्यावर लागू होत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
           सरकारी पक्षातर्फे केंद्रे दाम्पत्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी केंद्रे दाम्पत्याचा जमीन मंजूर केला. या प्रकरणी केंद्रे दाम्पत्याकडून वकील अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह वकील प्रेरणा चव्हाण , उत्क्रांती जाधव , प्रशांत वाठोरे यांनी काम पहिले.

Post a Comment

0 Comments