खड्ड्यां विरोधत डोंबिवलीत साखळी आंदोलन - माजी नगरसेवकांसह परिसरातील नागरिक उतरले रस्त्यावर

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली शहरातील रस्त्यातील खड्डयांवरून राजकीय पक्ष एकमेकांवर ताशोरे ओढत आहे.मात्र डोंबिवलीकरांनी  टीका करून शांत न बसता लोकशाही मार्गाने मानवी साखळी करत पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला.या आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक साई शेलारही सहभागी झाले होते.           माजी  नगरसेवक साई शेलारसह रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत रविवारी ठाकुर्ली येथील खंबाळपाडा येथील भोईर वाडी परिसरात  रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. विशेष म्हणजे लहान मुलांनी देखील खड्ड्यांमुळे  खेळायला आणि सायकल  चालवायला जागा नसल्याची तक्रार करत खेळायला कोणी मैदान देईल का असा आर्त सवाल उपस्थित केला.  या प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या शिवाजी शेलार यांनी सुसज्ज रस्त्याची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर त्यासाठी प्रयत्न केले.           मात्र गेल्या दीड वर्षापासून महापालिकेत प्रशासनाचे राज्य असून या रस्त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजप चे माजी नगरसेवक साई शेलार यांनी केली. या संदर्भात शहर अभियंता सपना कोळी यांना भेटून ठेकेदारांना पैसे दिले नसल्याने ते काम करत नसल्याची अनेक वेळा तक्रार केली आहे. 
           प्रभागातील शिवसेना शाखा ते बीएसयुपी तसेच शिवसेना  शाखा ते ९० फिट पर्यंतचे तीन ते चार रस्ते खड्डेमय असून चालायला देखील जागा नसल्याचं शेलार यांनी सांगितले. त्यामुळे खड्डे चुकवत चालवा गाडी आता आली भोईर वाडी, चंद्रपेक्षाही जास्त खड्डे भोईर वाडीत असा  विविध प्रकारच्या   घोषणांचे  फलक घेऊन नागरिकांनी साखळी आंदोलन केले.   इतकेच नव्हे तर आम्हाला खेळायला गार्डन मिळेल का असा सवाल एका चिमुरडीने केला.

Post a Comment

0 Comments