डोंबिवलीत बंदला संमिश्र प्रतिसाद ...शिवसेनेचा सहभागी नाहीडोंबिवली ( शंकर जाधव ) लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चीरडल्याप्रकरणी महविकास आघाडीतर्फे महारष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र कल्याण मध्ये पूर्ण आणि डोंबिवली शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. डोंबिवली पश्चिम येथील स्थानक परिसरात काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , लाल बावटा, रिपब्लिकन सेना तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहभागी होत जोरदार नारेबाजी केली. मात्र डोंबिवलीतील स्थानिक शिवसैनिक यात सहभागी झाल्याचे दिसून आले नाही. तर  कल्याण शहरात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून बंद मध्ये पाठिंबा दिला.
    


              कल्याण शहरात रस्ता रोको केल्याचे दिसून आले.    कल्याणात संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून रिक्षा चालकांना रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन देखील केले. डोंबिवली शहरात काँग्रेस , राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि  पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. पोलीस मुस्कटदाबी करत असल्याचा थेट आरोप या कार्यकर्त्यांनी पोलिसंवर केला. इतकेच नव्हे तर गळा दाबण्याची घटना युपी मध्ये घडली आहे. 
                अजय मिश्रा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली असून मोदी सरकार डोळे झाकून बसले आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला. डोंबिवली येथे झालेल्या आंदोलनात  कोग्रेस पदाधिकारी संतोष केणे, वर्षा गुजर- जगताप, गणेश चौधरी,अशोक कापडणे,संजय पाटील,राहुल केणे, प्रणव केणे, राष्ट्रवादीचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुरेश जोशी, नंदू धुळे,सामंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काळू कोस्माकर सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments