खाजगी रुग्णालयाचा मनस्ताप; हक्काच्या पगारासाठी गरोदर महिलेची वणवण भटकंती


■खासगी रुग्णालयाच्या विरोधामध्ये कामगार आयुक्तांसह पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज , एक वर्षांपासून ५० हून अधिक रुग्णालय कर्मचाऱ्यांचे वेतन खाजगी रुग्णालयाने ठेवले रोखून.


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण मधील कर्णिक रोड परिसरातील ए अॅण्ड जी रुग्णालयात कोरोनाच्या काळात अहोरात्र जीवाची बाजी लावून कोरोना काळात  रुग्णांची सेवा करणाऱ्या गरोदर नर्ससह कर्मचाऱ्यांना एक वर्षाचे वेतन मिळवण्यासाठी वणवण भटकंती करावा लागत आहे. 


          कल्याण मधील कर्णिक रोड परिसरातील ए अॅण्ड जी या खाजगी रुग्णालयात ५०  हुन अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात रुपाली शिंदे या नर्स गरोदर असतांनाही त्या कोरोनाच्या काळात पोटातील बाळाचा विचार न करत रुग्णाची सेवा करत होत्या मात्र गरोदर अवस्थेत रुपाली शिंदे हक्काचे वेतन मिळवण्यासाठी वणवण भटकत आहेत.


या हॉस्पिटल मध्ये २ वर्षापासुन काम करत असुन हॉस्पिटल मधील डॉक्टर गणेश पवार, डॉ. अमित गर्ग,  डॉ. प्रविण पाटील यांनी आमचा दोन वर्षापासुन आम्हांला अर्धा पगार देवुन अर्धा पगार अद्यापपर्यंत आम्हांला दिलेला नाही. कोविडच्या महामारीतसुध्दा आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता येणा-या लोकांची सेवा करून त्यांचे प्राण वाचवले आहे. 


तरीही कर्मचा-यांना अजुनही थकबाकी पगार दिलेला नाही. थकबाकी असलेल्या पगाराची विचारणा केली असता आज देतोउद्या देतो असे सांगुन आम्हां सगळ्या कर्मचा-यांची फिरवा फिरवी करून फसवणुक करीत असल्याचा आरोप येथील कर्मचारी सिद्धार्थ सूरडकर यांनी केला आहे.


ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना हक्काच्या पगारासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांनी या रुग्णालयाच्या विरोधामध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी, कामगार आयुक्तांसह, महात्मा फुले पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज केला असल्याची माहिती सिद्धार्थ सूरडकर यांनी दिली.  

Post a Comment

0 Comments