आशा फिटनेस सेंटरच्या खेळाडूंची राज्यस्तरीय सब - ज्युनिअर आणि ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आशा फिटनेस सेंटरच्या खेळाडूंची राज्यस्तरीय सब - ज्युनिअर आणि ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हि स्पर्धा ३० व ३१ ऑक्टोंबर रोजी गोवेली येथे जीवनदीप महविद्यालय मध्ये ठाणे जिल्हा पॉवरलीफ्टींग असोसिएशन ने आयोजित केली आहे.कल्याण तालुक्यातील छोट्याश्या आंबिवली गावामधील मोहने कोळीवाडा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक प्राध्यापक आरती चौधरी यांनी "आशा फिटनेस सेंटर जिम अँड स्पा" ही व्यायामशाळा चालु केली आणि त्यां स्वतः पॉवरलिफतीग खेळातील आंतरराष्ट्रिय पदक विजेत्या खेळाडू आहेत. आरती यांना स्वतःल पॉवरलिफ्टींग करण्यासाठी जवळपास १२-१३ किलोमिटर लांब जावे लागत होते म्हणून त्यांच्या आई च्या सांगण्यावरून मोहोने येथे व्यायामशाळा चालु केली. 


याठिकाणी पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टींग, बॉडी बिल्डिंग, गतका पारंपरिक युद्धकला आणि बरयाच खेळाचे प्रशिक्षण चालु केले आणि आज आरती यांचे विद्यार्थि सिद्धी जाधव, जयदीप यादव, आशिष कांबळे,जयेश चाव्हण, सुमित कांबळे,ओमकार तळेकर या खेळाडूंची पॉवरलिफ्टींग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड जाली. ह्या स्पर्धेच्या तयारीसाठी खेळाडूंना प्राध्यापक आरती चौधरी सोबतच प्राध्यापक रवींद्रनाथ गायकर व नवनाथ गायकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

Post a Comment

0 Comments