संजय गायकवाड प्रतिष्ठाणच्या १० दिवसीय विनामुल्य लसीकरण शिबीराला सुरवात खासदार डाँ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले उद्‌घाटन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरलेल्या लसीकरणाचा लाभ तिसगांवासह कल्याण पूर्वेतील  जास्तीत जास्त नागरीकांना घेता यावा या उद्देशाने संजय गायकवाड प्रतिष्ठाणच्या विद्यमाने विजय नगर येथील गौरी विनायक बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सच्या कार्यालयात २ आक्टोबर या महात्मा गांधी जयंती दिना पासुन पुढील सलग १० दिवस विनामुल्य लसीकरणाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे औपचारीक उद्‌घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या  हस्ते करण्यात आले.डॉ पूजा गायकवाड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला या शिबीराच्या उद्‌घाटन प्रसंगी कल्याण जिल्हा शिवसेना प्रमुख गोपाळ लांडगेकल्याण महानगर प्रमुख विजय साळवीनगरसेवक देवानंद गायकवाड महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडेआदर्श मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय शिर्केनगरसेविका शीतल मंढारीसुशीला माळीमहिला आघाडीच्या राधिका गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बोलतांना सांगितले की, डॉ. पूजा गायकवाड आणि संजय गायकवाड यांनी सामाजिक बांधीलकीतुन या परिसरातील नागरीकांना विनामुल्य लस उपलब्ध करून दिली आहे. ही बाब कौतुकास पात्र आहे भविष्यातही संजय गायकवाड यांच्या कडून भरीव असे समाज कार्य घडत राहो अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. 

Post a Comment

0 Comments