महापालिकेच्या उद्यानाची धोबीघाटासारखी अवस्था

 ठाणे महापालिकेच्या विटावा खाडी किनारी गणेश विसर्जन घाटा  जवळ असलेल्या उद्यानाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे.  या उद्यानामध्ये बसविण्यात आलेली खेळणी व व्यायामचे बसविण्यात आलेली लोखंडी खेळणी, बसायची बाकडे तुटले असून गवत ही वाढले आहे. या उद्यानाची सध्या प्रचंड दुरावस्था निर्माण झाली आहे. सध्या हे उद्यान धोबीघाट तयार झाले असून मोकळ्या उद्यानात येथील धोबी व मंडप व्यवसायिक धुतलेले कपडे सुकविण्यासाठी वापर करीत आहेत.

       गेल्या दहा वर्षांपूर्वी माजी नगरसेवक सुभाष खारकर व राजेश खारकर यांच्या प्रयत्नांतून विटाव्यातील जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना विटावा खाडी किनाऱ्यावर  विरंगुळा मिळावा लहान मुलांना खेळता यावा आणि जेष्ठ नागरिक, महिलांसाठी येथे छोटेखानी उद्यान उभारले आहे. परंतु त्याची आता प्रचंड दुरवस्था झाली असून त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सध्या विटावा खाडीकिनारी असलेल्या गणेश विसर्जन घाटाजवळ सकाळी आणि संध्याकाळी या परिसरातील नागरिक फिरायला येतात सध्या या उद्यानाच्या दुरवस्थामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. विटावा परिसरात हे एकमेव छोटेखानी उद्यान आहे. या परिसरातील लहान मुलांना ही खेळायला उद्यान नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या उद्यानाचे नूतनीकरण करावे अपेक्षा व्यक्त केली आहे.

    या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठवला होता. तो आता मंजूर झाला आहे.
-प्रियांका पाटील, स्थानिक नगरसेविका, विटावा Post a Comment

0 Comments