भिवंडीत अस्तित्व फाऊंडेशन व स्कील मीट अकॅडमी अंबाडी यांच्या संयुक्त विद्यमाने "कोरोना योद्धा"यांचा सत्कार समारंभ संपन्न

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी )  तालुक्यातील   कोरोना-19 या महामारीच्या अतिसंवेदनशील आजारपणाच्या कालावधीत अनेक स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ति आपली सामाजिक बांधिलकी स्विकारून स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍याचा जीव वाचविण्यासाठी  निःस्वार्थीपणे मानवसेवा केलेली  आहे.         अशांपैकी भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील अस्तित्व फाऊंडेशन व स्कील मीट अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी कोरोना रुग्णांसाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णालयात उत्तम रित्या केलेल्या सेवेबद्दल संबंधीत विद्यार्थी व सेवाभावी संस्थेचे कार्यकर्त्ये यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार समारंभ रेणुका  विद्यालय व ज्युनिअर काॅलेज झिडके येथे नुकताच संपन्न झाला आहे.
          यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकम अध्यक्ष-स्कील मीट वाडा तालुका यांनी केले. सदर कार्यक्रम मे.गाला कंपनीचे मालक, उद्योजक आशुतोष रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन अस्तित्व फाऊंडेशनच्या  अध्यक्षा अक्षया अनिल पाटील व स्कील मीट अकॅडमी अंबाडी येथील शाखेचे अध्यक्ष पंढरीनाथ मराडे आणि या सेवाभावी संस्थेचे आधारस्तंभ समाजसेवक स्वामी नित्यानंद बाबा यांचे परमभक्त रामचरण तथा रामूकाका नाईक यांच्या सहकार्यातून करण्यात आला.       
         कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून,मे.गाला कंपनीचे सहमालक उद्योजक पटेल ,देशमुख,विद्या नाईक,विजय गायकवाड,अमित म्हस्के,(स्कील मीटचे प्राचार्य)पत्रकार दीपक हिरे,सामाजिक कार्यकर्त्ये सुभाष पाटील,डॉक्टर माधवराव वाघमारे,एन्.टी.पाटील ,बाविस्कर मॅडम,साधना भोईर ,विलास माळी ,आदिंची उपस्थिती होती.यावेळेस पाहुण्यांच्या हस्ते सुमारे 48 विद्यार्थी व कार्यकर्त्ये यांचा सत्कार करण्यात आला.
                 संबंधित दोन्ही संस्थाचालक यांच्या सामाजिक कार्याबद्दल मनोगत व्यक्त करताना विद्या नाईक,विजय गायकवाड,डॉक्टर माधवराव वाघमारे,आशुतोष रणदिवे यांनी कृतज्ञतापूर्वक भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनिल पाटील सर यांनी केले.अशा प्रकारे कोरोना योद्धयांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments