शिवसेनेकडून शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

 डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्य सरकारच्या निर्णयानुसार करोना नियमाचे पालन करून शाळा सुरु करण्यात आल्या. शिवसेना विभाग प्रमुख अमोल पाटील यांनी गोग्रास वाडी विभागातील मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालया तील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले.             मंगेश मोरे,  प्रशांत खामकर, प्रफुल तावडेबी.एल.ए सुशील कुमार सिंग आदि पदाधिकारी उपस्थित होते.शाळेत विद्यार्थी व पालकांनी तोंडावर मास्क घालून प्रवेश केला.प्रत्यक्ष शाळेत आल्याचा आनंद  विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिवसेना विभाग प्रमुख पाटील यांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, करोना नियमाचे कसे पालन करावे याविषयी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments