पाण्यासाठी वंचितचा केडीएमसीवर हंडा कळशी मोर्चा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  दिवाळीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही ठीकाणी पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे.  पाणी समस्या सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे केडीएमसी मुख्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढण्यात आला. केडीएमसी टँकर माफियाना पोसतेय असा आरोपी करीत प्रशासन आणि सत्ताधा:यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.          कल्याण डोंबिवली करांच्या हक्काच्या "पाण्यासाठी" वंचीत बहुजण आघाडीच्या वतीने डोंबिवली शहर पूर्व अध्यक्ष सुरेन्द्र ठोके आणि कल्याण शहर पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर हांडा कळशी मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाणे जि. महिला अध्यक्ष माया कांबळे, महासचिव मिलिंद साळवे, डोंबिवली शहर उपाध्यक्ष राजू काकडे, ठाणे जि. महिला महासचिव रेखा कुरवारे, ठाणे जिल्हा संघटक सुनील पगारे आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.या मोर्चात पाण्यासाठी आंदोलने करणाऱ्या महिलांनी डोक्यावर रिकाम्या  हंडा कळशी घेऊन प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कल्याण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भेद्साव्नार्या पाणी समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी यावेळी या महिलांनी केली. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांना आणि अनधिकृत इमारती उभारण्यासाठी पाणी कनेक्शन घेतले जात असून नागरिकाच्या हक्काचे पाणी भूमाफिया पळवून नेत असल्याने या अनधिकृत कनेक्शनवर कारवाई करण्याची मागणी या मोर्चेकराणी केली. तर बल्याणी भागात पालिकेने नागरिकाच्या सोयीसाठी उभारलेला जलकुंभ रिताच असून नागरिकांना या जलकुंभातून पिण्याचे पाणी केव्हा मिळणार असा सवाल शिष्टमंडळाने केला. मात्र नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावाना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जात असून एमआयडीसी कमी दाबाने पाणी पुरवठा करत असल्याने हि पाणी समस्या भेडसावत असून पाण्याचा दाब वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांना दिल्याचे पाणी पुरवठा अधिकार्यांनी सांगितले तर बल्याणी येथील पाण्याच्या टाकीतून मोठ्या प्रमाणात लिकेज होत असल्याने या टाकीची दुरुस्ती करण्याचे काम लवकरच सुरु केले जाणार असून हि दुरुस्ती झाल्यावर हि टाकी वापरात आणण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments