रिपाइं ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांचा राजीनामा
ठाणे, प्रतिनिधी  :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन रिपाइं मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंग यांच्याकडे त्यांनी शुक्रवारी अध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्त केला. २००७ पासून ते या पदावर  कार्यरत होते.           त्यांच्या राजीनाम्याने ठाण्यात रिपाइं पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिकेत त्यांच्यासह तीन नगरसेवक निवडून आले होते. पदाचा राजीनामा देताना त्यांनी वैयक्ति कारण सांगितले आहे. ठाण्यातील राजकीय वर्तुळात त्यांनी एक दरारा निर्माण केला आहे. ठाण्यात रिपाइं पक्षाला बळकटी देण्यात तसेच पक्षाला वेगळी ओळख करून देण्यात त्यांना यश आले होते.            ठाणे महानगर पालिकेची निवडणुक जवळ येऊन ठेपली असताना त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यात त्यांच्या राजीनाम्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तायडे यांच्या राजीनाम्याने ठाणे रिपाइंची मोठी हानी झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आता तायडे कोणता निर्णय घेणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments