एस.टी. कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी विविध संघटना एकत्रित संपूर्ण महाराष्ट्रात आज लाक्षणिक उपोषण
ठाणे , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळातील कर्मचा-यांच्या विविध मागण्यासाठी महामंडळातील विविध संघटनांनी एकत्र येऊन आज संपूर्ण महाराष्ट्रासह ठाण्यातील विभागीय कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले.

             

              शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागु करावा,वार्षिक वेतनवाढ २ वरुन ३ टक्के मान्य केलेल्या तारखे पासून लागु करावेत तसेच सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागु केलेला घरभाडे भत्ता सुधारीत दराने लागु करावा यासाठी गेले काही महिने एसटी तील सर्वच युनियन एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होत्या


                परंतु शासनाने एसटी कर्मचा-यांच्या तोंडाला पाने पुसत केवळ ५ टक्के महागाई भत्ता जाहीर करून एक प्रकारे कर्मचाऱ्यांची थट्टा केल्याची भावना कर्मचांऱ्यामध्ये निर्माण झाली आहे दिवाळी तरी आनंदात जाईल अशी कर्मचा-यांची अपेक्षा होती ,

 

                महागाई चा भडका उडालेला असताना कर्मचाऱ्यांना  २५०० रुपये व अधिका-यांना ५००० रुपये  दिवाळी भेट एसटी ने जाहीर केली आहे ती अगदिच तुटपुंजी आहे या तुटपुंज्या रक्कमेत दिवाळी कशी साजरी करायची? हा एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला थेट प्रश्न विचारला आहे.


              एकाबाजुला उसनवारी वर घेतलेल्या पैशाचा सावकारी पाश ,मुलांच्या शिक्षणाचा खर्च ,आजारपण त्यातच वेळेवर न मिळणारा पगार या विवंचनेतुन आतापर्यंत २५ पेक्षा  जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाउल उचललेले असताना आहेअजुन किती आत्महत्या व्हाव्यात असे सरकारला वाटते?असा सवाल केला आहे.

    

               महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने दिलेली ५ टक्के  महागाई भत्त्यात केलेली वाढ मान्य नाही.ती २८ टक्के लागु करावी ,तसेच  वार्षिक वेतनवाढीचा दर २ वरुन ३ टक्के करणे तसेच केंद्र व राज्य शासनाप्रमाणे सुधारित दराने घरभाडे भत्ता लागु करणे या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आहेत .


               प्रशासनाने या  मागण्या मान्य न केल्याने एसटी त कार्यरत असलेल्या सर्व कामगार युनियन एकत्र आल्या आहेत जो पर्यत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आता माघार घेतली जाणार नाही असा निर्धारच सर्व युनियनी व्यक्त केलेला आहे व म्हणुन राज्यभर सर्व युनियन नी एकत्र येत कृती समिती स्थापन करत बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसलेले आहे .


तसे संयुक्त पत्र ठाणे विभागातील कृती समितीने विभाग नियंत्रक कार्यालयाला दिलेले आहे.


         ठाणे विभागातही विभाग नियंत्रक कार्यालया समोर दि २७ आक्टोबर पासुन हे बेमुदत उपोषण सुरु झाले असुन आता मागण्या मान्य झाल्या शिवाय माघार नाही असा निर्धारच कृती समितीतील नेत्यांनी व्यक्त केला तसे संयुक्त पत्र प्रसिद्धीस दिलेले आहे.

        

          या उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष हरि माळी,ठाणे जिल्हा इंटकचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव सचिन पवार,अध्यक्ष संदिप माने,महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मुकुंद मोरे,सचिव नंदकुमार देशमुख ,नाना साळवी,


           महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेचे,किरण अवसरमोल ,राजु सकपाळ ,महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन चे दत्ता शिंदे ,शिवाजी  यशवंतराव ,कास्ट्राईब चे एम .जी .कांबळे ,महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे शामराव भोईर ,शांताराम पाटील ,सुभाष पवार आदि विविध सघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments