कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ठाणकर पाडा येथील शिवनेरी व धनवे चाळ प्रभाग २९ येथे चेकर्स लादी कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. विभाग प्रमुख व नगरसेवक मोहन उगले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
कल्याण पश्चिम ठाणकर पाडा येथील शिवनेरी व धनवे चाळ प्रभाग २९ मधील नागरिकांनी विभाग प्रमुख व नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे प्रभागात लादी काम करण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नगरसेवक मोहन उगले यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सहकार्याने चेकर्स लादी कामाला मंजुरी मिळवली. विभागप्रमुख व नगरसेवक मोहन उगले यांनी सांगितले कि ठाणकर पाडा शिवसेना शाखेत तक्रारी आल्यानंतर आमदारांना सांगितल्या जातात व त्याप्रमाणे पाठपुरावा करुन कामे मंजूर केली जातात. आमदारांच्या सहकार्याने कामे सुरु केली जातात. यापुढेही अशीच विकास कामे केली जातील असे सांगितले.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, विधानसभा संघटक अरविंद मोरे, उपशहर प्रमुख रवि पाटील, विभाग प्रमुख व माजी नगरसेवक विद्याधर भोईर, नगरसेवक मोहन उगले, शहर संघटक सुजाता धारगळकर, महीला शाखा संघटक नेत्रा मोहन उगले, मीना सावंत, शाखाप्रमुख स्वप्नील मोरे, अंनता पगार यांच्यासह शिवसेना कार्यकते महीला आघाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments