भिवंडीतील युवा कवी मिलिंद जाधव '' गोल्डन प्रेस्टीज '' पुरस्काराने सन्मानित




भिवंडी  दि 15 ( प्रतिनिधी  ) होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या  प्रथम वर्धापन दिनानिमित्त  होप मिरर फाउंडेशन  स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी  मिलिंद सुरेश जाधव यांना नुकतेच  ''गोल्डन प्रेस्टीज'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 



            युवा कवी मिलिंद जाधव हे भिवंडी तालुक्यातील समतानगर, पडघा या ग्रामीण भागात  राहत असून ते विविध विषयावर उत्तम कविता लिहून  प्रबोधन करीत असतात. त्यांचा सामाजिक तसेच  विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध कवी, साहित्य संमेलनात त्यांचा  सहभाग असून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता शाळेत  तर विविध ठिकाणी सादर करीत प्रबोधन करीत असतात. एवढंच नव्हे तर, अष्टपैलू व्यक्तित्वामुळे  एक युवा कवी  म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. अनेक कार्यक्रमात ते सूत्रसंचालनाची धुरा सुध्दा सांभाळत असतात. 




             म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन गुरुवारी दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी  होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या  प्रथम वर्धापन दिनानिमित्त  होप मिरर फाउंडेशन  स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडघा ,समतानगर( बोरिवली)  येथे राहणारे युवा कवी  मिलिंद सुरेश जाधव यांना सिनेकलाकार  अरुण बक्षी, सिनेअभिनेत्री आरती नागपाल  होप मिरर फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  रमजान शेख यांच्या हस्ते तर सीने कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या  उपस्थितीत  ''गोल्डन_प्रेस्टीज'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 




            पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून युवा कवी मिलिंद  जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून  त्यांचे  कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments