करोना काळात खाजगी रुग्णालयाने राज्य सरकारला मदत केली जगन्नाथ शिंदे
डोंबिवली ( शंकर जाधव )  १९ नोव्हेबर २०१९ रोजी देशात तर ३१ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात करोना महामारीने शिरकाव केला.अचानक महामारी आल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाले.देशातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणेने कोव्हीड रुग्णालये सुरु केली.मात्र याला सर्वात जास्त खाजगी रुग्णालये आणि डॉक्टरांनी मदत केली.त्यामुळे करोनाच्या काळात सरकारी आरोग्य यंत्रणा कमी पडल्याचे दिसले असे मत राष्ट्रवादि कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात व्यक्त केले.


          डोंबिवली पूर्वेकडील आयरेगावातील स्पेशिया आर्केड इमारतीत अॅपल रुग्णालयाच्या उद्घाटनप्रंसगी ते बोलत होते.यावेळी चेस्ट फिजिशियन डॉ.संतोष गोरे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे,कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील,डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुरेश जोशी,समीर भोईर, नंदू मालवणकर, समीर गुधाटे,राजेंद्र नांदोस्कर,जगदीश ठाकूर,निरंजन भोसले,राहूल चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.रुग्णालयाच्या उद्घाटनंतर शिंदे म्हणाले, करोना काळात सरकारची आरोग्य यंत्रणा कमी पडल्याचे सिद्ध झाले आहे.          खाजगी रुग्णालयाने सरकारला ९० टक्के मदत केली.त्यामुळे सरकारने यातून धडा घेऊन सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा वेळेवर मिळणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात केंद्र सरकारला आरोग्य ११ ते १२ टक्के जीडीपी खर्च करावा लागेल.तर डॉ. संतोष गोरे म्हणाले,शहरी आणि ग्रामीण भागात रुग्णालयाची गरज हे करोना काळात समजले आहे.वेळेवर उपचार घेतल्यास करोना हा आजार बरा होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments