दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दिव्यांग कला केंद्रातील प्रत्येक विद्यार्थी कलाकारांचा एक आत्मविश्वास वाढविणारा प्रवास "अरेरे ते अरेव्वा" 
ठाणे,  प्रतिनिधी  :  दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दिव्यांग कला केंद्रातील प्रत्येक विद्यार्थी कलाकारांचा एक आत्मविश्वास वाढविणारा प्रवास "अरेरे ते अरेव्वा" या विशेष सदरातून अनुभवाचे बोल च्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे.          आपण कोणतीही दिव्यांग व्यक्ती दिसली की सहानुभूती दाखवत पटकन अरेरे असे उद्गगारतो, या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या अंगीभूत कलागुणांना एक आकार देऊन त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी किरण नाकती यांच्या संकल्पनेतून दिव्यांग कला केंद्राची सुरुवात ५ वर्षांपूर्वी करण्यात आली व या केंद्रात बघता बघता एकूण वीस दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. 
         अर्थात वयाचे कोणतेही बंधन नसल्याने व विनामुल्य प्रवेश असल्याने विद्यार्थांच्या पालकांना हे सुकर झालं. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कला लोकांसमोर आणण्याच्या दृष्टीने हा प्रवास सुरू झाला.या किरण नाकती यांच्या प्रवासाला संध्या किरण नाकती यांनी मोलाचा हातभार लावला व हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले.
          त्या सोबत विविध सोळा प्रकारच्या कला शिकविण्यासाठी नृत्य ,गायन, चित्रकला, हस्तकला,नाट्य, लेखन, स्पीच थेरेपी, फोटोग्राफी असे अनेक विभाग सज्ज झाले. त्यासाठी कै अनिता महाजन, संध्या नाकती, किरण नाकती, परेश दळवी, वीणा टिळक, अथर्व नाकती, रश्मी असई अशा अनेकांनी मेहनत घेतली व घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments