कल्याण पूर्वेत राष्ट्रवादीची निदर्शने
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : उत्तर प्रदेशातील लखिंपुर मधील शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कल्याण पूर्व विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पूर्व मध्यवर्ती कार्यालयापासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून नाना पावशे चौक, दुर्गा माता मंदिर, गणेश विद्या मंदिर, लालन स्टोअर ते गणपती चौक कोळसेवाडी पासून तानाजी चौक, जुने पोलीस स्टेशन मार्ग शिवसेना कार्यालय समोर ते काटेमानिवली शाळा मार्ग तानाजी चौक ते काटेमानिवली नका या ठिकाणी चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधातील आणि शेतकऱ्यांच्या  समर्थनार्थच्या  आंदोलनामध्ये सामील होण्याचे आवाहन राष्ट्रवादीने दुकानदारांना केले. व्यापाऱ्यांनी देखील या आवहानाला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मनोज नायर, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष अर्जुन नायर, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, मीनाक्षी आहेर, विजय मोरे, सुभाष गायकवाड, एकनाथ म्हात्रे, प्रकाश तरे, जानू वाघमारे आदींसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Post a Comment

0 Comments