भिवंडीत वाहन चोरी व मोबाईल चोरी गुन्हयातील दोन आरोपींना कोनगाव पोलीसांनी केली अटक

भिवंडी  दि. १(प्रतिनिधी  ) मागील काही दिवसा पासून भिवंडीत वाहन चोरीसह मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी पोलोसांकडून प्रयत्न सुरु असून वाहन चोरी व मोबाईल चोरी गुन्हयातील दोन आरोपींना कोनगाव पोलीसांनी केली अटक केल्याची माहिती कोनगाव पोलोसांनी गुरुवारी दिली आहे.            कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पराग भाट व तपास पथकातील अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी फकीर मोहम्मद नजीर इनामदार ( वय ३० वर्षे, रा. कल्याण ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने दोन मोटार सायकल व एक ऑटो रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली असून हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.              त्याच बरोबर मोबाईल फोन चोरी करणारा आरोपी फिरोज रजा मोहम्मद शरीफ शेख ( वय २३, रा. रांजणोली , मुळगाव- जि. फैजाबाद, उत्तरप्रदेश ) याचा कसोशीने शोध घेवून त्यास साईबाबा मंदीरासमोरून ताब्यात घेवुन त्याचेकडून एपल आय फोन कंपनीचा एक मोबाईल व ओपो कंपनीचा एक मोबाईल असे दोन फोन जप्त करून त्यास अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींकडून कोनगाव पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोनगाव पोलीसांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments