कल्याण पूर्वेत महापरीवाराच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : सम्राट अशोका विजया दशमीच्या ६५ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन कल्याण पूर्वेत महापरिवाराच्या साजरा करण्यात आला. तथागत भगवान गौतम बुद्धांनी इ.स. पूर्व ५२८ च्या आषाढ पौर्णिमेला सारनाथ येथे केले. त्यांनी कौंडिण्यवप्पभद्दीयअश्वजित आणि महानाम या पाच परिव्रजकांना धम्माचे सार म्हणजे विशुद्धीमार्ग सांगून पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले.आपल्या राज्याभिषेकाच्या ८ व्या वर्षी इ.स. पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोकाने कलिंग देशावर आक्रमण केले. तेराव्या शिलालेखानुसार कलिंग युद्धात १ लाख ५० हजार लोकांना बंदी करुन निर्वासित केले गेले. जवळपास १ लाख लोकांची हत्या झाली. यानंतर कलिंग देशावरील विजयाच्या १० व्या दिवशी अशोकाने धम्म दीक्षा घेतली. त्या दिवसाला जगाच्या इतिहासामध्ये अशोका विजया दशमी” म्हटले जाते. सम्राट अशोका सोबत जवळपास ८० हजार लोक होते. त्यानंतर जवळपास २२१६/१७ वर्षांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागभूमितनाग नदीच्या काठीनागपूर येथे अशोका विजयादशमी दिनी म्हणजे १४ ऑक्टोबर,१९५६ रोजी आपल्या ५ लाख अनुयायासह मोठी धम्मक्रांती केली.या  ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात जेष्ठ बोद्धाचार्य नामदेव जाधव यांनी उपस्थितांना त्रीसरण पंचशील ग्रहण करून महापुरुषांच्या जीवनाची माहिती दिली. यावेळी महापरीवाराचे संस्थापक अध्यक्ष रंजन पवार, खजिनदार अविनाश गायकवाड, कार्याध्यक्ष प्रभाकर जाधव, संजय धनगर, सदस्य प्रकाश जाधव, नितीन जाधव, शशिकांत मुंढेकर, हरी भालेराव, अन्वर शेख, धर्मा वक्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार अशोक कांबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments