संवेदनांची वेदना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अविनाश पाटील संपादित झाड या विषयांवरील काव्यसंग्रह


■राजकारणी जातीयता आणि धर्मांधता पोसत आहेत डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन....


कल्याण , कुणाल   म्हात्रे  :   राजकारणी जातीयता आणि धर्मांधता पोसत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अंघोळीची गोळी संस्था आणि साहित्यविश्व प्रकाशन आयोजित व अविनाश पाटील संपादित संवेदनांची वेदना या झाड विषयावरील काव्यसंग्रहाचे प्रकाशन करते वेळी केले.आज बहुसांस्कृतिक महाराष्ट्रातील राजकारण फार गलिच्छ झाले आहे. संपत्ती आणि सत्तेसाठी गुंडांच्या झुंडी याच राजकारणाच्या माध्यमातून सामान्यांचे शोषण करत आहेत. मतांच्या राजकारणासाठी मानवतेमध्ये फूट पाडून राजकारणी आज जातीयता आणि धर्मांधता पोसत आहेत. राजकारण हे सत्तासंपत्ती आणि कुटुंबकेंद्री नाही. राजकारण हे ठराविक लोकांचीच मक्तेदारी नाही. लबाड आणि घोटाळे बहाद्दरांचेच राजकारण ही राजकारणाबद्दलची मलिन प्रतिमा आता आजच्या युवकांनी समूळ नष्ट करायला हवी. आणि सामान्य कुटुंबातील सद्विवेकी आणि सज्जन युवकांनी समाजकार्याचा विचार घेऊन राजकारणात यायला हवे. युवकांनो संघर्ष करा. सर्व पक्ष पादाक्रांत करा आणि समाज हितासाठी सज्जनपणाचे राजकारण करा असा सल्ला देखील सबनीस यांनी दिला.सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक अधिकारी रंगनाथ नाईकडे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनातील सामाजिक कार्याची व्याप्ती आणि सामाजिक संस्थाचे योगदान व महत्व यावर प्रकाश टाकत नाईकडे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. अंघोळीची गोळी या संस्थेचे संस्थापक माधव पाटीलराज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य डॉ. महेश थोरवे पुस्तकाचे संपादक अविनाश पाटीलखिळेमुक्त झाड उपक्रमाचे समन्वयक तुषार वारंगप्रकाशक विक्रम मालन आप्पासो शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
 झाडं लावणारेजगवणारे आणि झाडांनाही संवेदना असतात हे जाणणारे तरुण कार्यकर्ते समृद्ध पर्यावरणाचा वारसा जोपासत आहेत असे यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले. या काव्यसंग्रहामधील चौऱ्यांशी कवींनी लिहलेल्या कविता माणसाला पर्यावरण विकास आणि संवर्धनाची जाणीव करून देतात.  पर्यावरण रक्षणासाठी झाडचं माणसाशी संवाद करत असल्याचा आणि त्यांच्या व्यथा सांगत असल्याचा भास यातील अनेक कविता वाचताना होतो. पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक चळवळी आज लोप पावत असताना आपल्या कामातून आणि साहित्यातून या संस्थेचे हे तरुण कार्यकर्ते पर्यावरण संवर्धनासाठी विधायक कार्य करत आहेत ही अभिमानाची आणि अनुकरणीय बाब आहे असेही ते यावेळी म्हणाले.सामाजिक संस्थांबरोबर आपण सर्वांनी  वृक्षसंवर्धनपाणीबचत अशा बाबतीत आपली या निसर्गाप्रतीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. झाडे लावली पाहिजेतझाडे जगवली पाहिजेत आणि बेसुमार होणारी वृक्षतोड थांबवून झाडांच्याही संवेदना जाणता आल्या पाहिजेत असा सल्लाही यावेळी त्यांनी सर्वांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल शिरसाठ यांनी केलेसंपादकीय भूमिका अविनाश पाटील यांनी मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बर्वे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माधव पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments