Header AD

शिक्षकांना 'नेशन बिल्डर अवॉर्ड' पुरस्कार प्रदान करून सन्मान

डोंबिवली ( शंकर जाधव ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स या संस्थेच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने शिक्षणक्षेत्रात १० वर्षे आणि अधिक कालावधीत आपले योगदान देणाऱ्या जिल्हा परिषद आणि परिसरातील कॉलेज आणि शाळेच्या १६ शिक्षकांचा 'नेशन बिल्डर अवॉर्ड' पुरस्कार प्रदान करून सन्मानित  करण्यात आले. डिजी डॉक्टर मयुरेश वारके, एजी अजिंक्य आंबेडकर, क्लब प्रेसिडेंट किरण तानपाठक सेक्रेटरी सागर म्हाप्रोळकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 
          कल्याण, डोंबिवली, पडघा, तळोजा येथील शिक्षकांचा यात समावेश होता. शिक्षक हे  ज्ञानदानाचे माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करतात या जाणिवेतून क्लबच्या माध्यमातून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  आमच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी आमची निवड करून आपल्या क्लबने आम्हाला हा  मान दिला आहे ,त्यामुळे हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य अजून उत्साहाने पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळाली असे यावेळी शिक्षकांनी आयोजकांचे आभार मानले.  
          याप्रसंगी रोटरीचे वेबमास्टर रोटे प्रशांत आंबेकर हेही उपस्थित होते. या सोहोळ्यासाठी प्रोजेक्ट हेड रोटे गजानन धर्माधिकारी, रोटे सागर म्हाप्रोळकर, रोटे अविनाश चौगुले, रोटे विद्याधर कुलकर्णी, रोटे प्रशांत बापट, रोटे निलेश सोनावणे, रोटे बॉबी पिंटो, रोटे किशोर मुळे, रोटे रुपाली बुटाला यांनी विशेष मेहनत घेतली. या सोहोळ्यासाठी उद्योगपती आणि अभिनव सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रोटे दिलीप भोईर, केअर पॉईंट या डायग्नोस्टिक सेंटरचे रोटे अविनाश चौगुले हे पुरस्कर्ते म्हणून लाभले होते.
शिक्षकांना 'नेशन बिल्डर अवॉर्ड' पुरस्कार प्रदान करून सन्मान शिक्षकांना  'नेशन बिल्डर अवॉर्ड' पुरस्कार प्रदान करून  सन्मान Reviewed by News1 Marathi on October 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads