दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्वर्गीय ह.श. कांत नावाने कार्यकर्ता रिलीफ फंड ट्रस्टची स्थापना पहिल्या दिवशी दीड लाख रुपये जम

 
डोंबिवली  ( शंकर जाधव )  भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा तर्फे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डोंबिवलीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय ह.श. कांत यांचे नावाने कार्यकर्ता रिलीफ फंड या नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आली. पूर्वेकडील सावरकर रोडवरील जाणता राजा या आमदार रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता.उदघाटन दिवशी दीड लाख रुपये जमा झाले.
           यावेळी ट्रस्टच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस मनोज राय, अर्जुन म्हात्रे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रेखा चौधरी, डोंबिवली महिला आघाडी पदाधिकारी पूनम पाटील , युवा अध्यक्ष मिहीर  देसाई, मंडल अध्यक्ष नंदू जोशी, नंदू परब, प्रदीप चौधरी, राजेंद्र वारे, संजय मोरे, नाना सूर्यवंशी, विकास म्हात्रे, राहुल दामले, लक्ष्मण पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 
             यावेळी मान्यवरांनी जेष्ठ कार्यकर्ते कै. ह.श. कांत यांच्या तत्कालीन कामाची आठवण करून दिली. खऱ्या कार्यकर्त्याच्या नावाने हा ट्रस्ट सुरू झाला आहे. अशा गोष्टीची आवश्यकता होती. कांतबाबू यांना जरी कौटुंबिक अडचणी आल्या तरी पार्टीचे काम कधीही सोडलं नाही. ते आणीबाणी काळात कार्यरत होते. एक आगळ- वेगळं व्यक्तमत्व त्यांचं होत. अशा संस्थेमुळे एक चांगला संदेश पुऱ्या महाराष्ट्रात जाईल.

           कल्याण जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना वेळप्रसंगी लागणाऱ्या मदतीसाठी या ट्रस्टची स्थापना करण्यात आलेली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दवाखान्यातील उपचारासाठी, मुलीच्या लग्नासाठी, शिक्षण, मृत्यूनंतर काही रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments