महा. अंनिस ठाणे जिल्ह्याच्या वतीने 'जागर स्त्री शक्तीचा'
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीठाणे जिल्ह्याच्यावतीने घेण्यात आलेल्या 'जागर स्त्री शक्तीचाया उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील सात कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये अनाथ- निराधारांना मायेचा आधार देणाऱ्याकोरोना काळात भरीव कार्य करणाऱ्यासंविधानिक विचारांचा प्रचारप्रसारप्रसिद्धी करणाऱ्या कल्याण येथील समाजसेविका डॉ. सुरेखा जाधव,  भिवंडी येथील शिक्षिका मृणाल नितीन समेळअनेक सामाजिक कुप्रथांचा सामना करत प्रचलित विचारांना फाटा देत आपल्या आयुष्याची घोडदौड उंचावणाऱ्या कल्याण येथील लघु उद्योजिका मानसी वाघमारे व संघमित्रा साळवी तसेचअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्व अडथळे पार करत शिक्षणाची कास धरणाऱ्या मैत्रकूल संस्थेच्या अध्यक्षा विजेता भोनकरजन्मापासून आलेल्या दिव्यंगात्वर समर्थपणे मात करत उभ्या राहिलेल्या सुशीला गायकवाडधुणीभांडी करत मुलाला इंजिनिअर बनवणाऱ्या प्रणिता गायकवाड आदी महिला मान्यवरांचा समावेश आहे. या महिलांना महा. अंनिसच्या ठाणे जिल्ह्यातर्फे  सन्मानपत्र आणि पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.या महिला विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपल्या कर्तबगारीने नेहमीच्या चौकटी मोडून समाजासाठी भरीव कार्य केले आहे तसेचसमाजासाठी अनुकरणीय ठरल्या आहेत. आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या या तळागाळातील महिलांचा सत्कार महा. अंनिस ठाणे जिल्ह्यातर्फे करण्यात आला.


Post a Comment

0 Comments