समर्थ जनआधार प्रतिष्ठानच्या कल्याण - डोंबिवली शहर अध्यक्षपदी सिद्धेश चव्हाण

 डोंबिवली , प्रतिनिधी :  समर्थ जनआधार प्रतिष्ठानच्या कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्षपदी सिद्धेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रतिष्ठानचे संस्थापक –अध्यक्ष दिनेश पोळेकर यांच्या आदेशानुसार व सर्व सदस्यांच्या सहमताने नियुक्ती झाली. 


           समर्थ जनआधार प्रतिष्ठान सामाजिक उपक्रम करत असून आजवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत.प्रतिष्ठानच्या कामाला पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेऊन असे नवनियुक्त कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments