कल्याणच्या काळा तलावात आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह

 कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  कल्याण पश्चिमेकडील काळा तलाव येथे आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली.           अग्निशमन विभागाच्या मदतीने महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या महिलेचे वय अंदाचे ६५  वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटली नसून ही महिला कोण आहे, ती काळा तलाव परिसरात कशी आली याचा तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments