हरवलेली दोन मुले मानपाडा पोलिसांनी शोधली...
डोंबिवली ( शंकर जाधव ) अवघ्या काही तासात दोन लहान मुलांना शोधण्यात मानपाडा पोलिसांनी यश मिळविले आहे. ही दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची नोंद होण्यापूर्वीच त्यांना शोधून काढणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत आहे.


     
         पोलिस ठाण्यातून मिळालेल्या महितुनुसार, डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाड्यात राहणारी असलेल्या चुडामणी कृष्णा सोनार (४९) ही महिला घरकाम करते. रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या चुडामणी नेहमीप्रमाणे घरकाम करण्यास बाहेर गेली. जाताना तिने दुर्गा (४) आणि गणेश (२) ही दोन्ही मुले मानपाडा रोडला सागांवमध्ये राहणाऱ्या पुजाबाई चौहाण या बहिणीच्या घरी ठेवली होती.          पुजाबई घरातझोपली तेव्हा तिने दाराला आतून कडी लावली होती. सकाळी १० वाजता जेव्हा जाग आली तेव्हा तिला घराचा दरवाजा उघडा असलेला दिसला. तर दोन्ही मुले घरात नसल्याचे तिने आजुबाजुच्या परिसरात मुलांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र मुले कुठेही आढळून न आल्याने पुजाबाई आणि चुडामणी या दोघा बहिणींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.           वपोनि शेखर बागडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ बीट मार्शल व गुन्हे प्रकटीकरण पथकाला आपल्या हद्दीसह बाजारपेठ, रिक्षा स्टॅन्ड, मोकळी मैदाने, आदी ठिकाणी मुलांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकांनी सागांवकडून डोंबिवली स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला शोध सुरू केला.             डोंबिवली रेल्वे स्टेशनचे दिशेने एकमेकांचे हात धरून जाताना आढळून आलेल्या दोन्ही लहान मुलांना मानपाडा  पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. या दोन्ही मुलांना त्यांची आई चुडामणी सोनार हिच्या ताब्यात दिले. 

Post a Comment

0 Comments