फुलबाग विभागाच्या उपाध्यक्षपदी प्रशांत माळी

 कल्याण , प्रतिनिधी  :  सावित्रीबाई फुले सहाय्यक शिक्षण मंडळ विभागाच्या फुलबाग विभागासाठी विभागीय उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळी यांची बिनविरोध नियुक्ती झाली आहे. माळी समाज बळकट करण्यासाठी, समाजातील युवकांना बरोबर घेऊन भावी पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले यांचा विचार तळागाळात पोहचविण्याचे कार्य प्रशांत माळी करीत आहेत. त्यांचे हे काम पाहून त्याच कामाची पोचपावती म्हणून माळी समाज हॉल मध्ये अध्यक्ष एन. जी. माळी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम मधील फुलबाग विभागासाठी साठी उपाध्यक्ष पदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने झालीत्यामध्ये  उपाध्यक्ष पदावर प्रशांत माळी यांची बिनविरोध नियुक्ती झाली. याप्रसंगी माजी अध्यक्ष शरद महाजन तसेच विश्वस्त डी के बापू माळी यांनी प्रशांत माळी यांचे अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments