फूट ओव्हर ब्रीजच्या ठिकाणी मोठे रेडियम दिशादर्शक बोर्ड लावण्यात यावे - राहुल पिंगळे
ठाणे , प्रतिनिधी  :  कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होईल यावेळी कामाच्या ठिकाणी वाहने महामार्ग मार्गे सरळ मार्गक्रमण न करता नव्या कोपरी पुलावरून मार्गक्रमण करतील. तीन हात नाका उड्डाण पुला वरून वेगाने येणाऱ्या वाहनांना सद्यस्थितीत या ठिकाणी असलेले दिशादर्शक (वळण रस्ता) फलक अतिशय लहान असल्याने स्पष्ट तर दिसत नाहीतच व सदोष असल्यामुळे अनेक वेळा वाहनचालक संभ्रमात पडून अपघात जन्य परिस्थिती निर्माण होत.          आहे म्हणूनच इतर महामार्गावर ज्या प्रमाणे मोठे दिशादर्शक फलक लावतात त्याप्रमाणेच  फूट ओव्हरब्रीज च्या ठिकाणी मोठे रेडियम दिशादर्शक बोर्ड लावण्यात यावेत जेणेकरून तीन हात नाका उड्डाणपूल मार्गे वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना लांबूनच दिशादर्शक फलक दिसल्याने नव्याने एखादा अपघात होणार नाही कोपरी पुलाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाच्या वेळी संबंधित काम करणार्‍या यंत्रणेने वाहतूक सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याचे  वेलोवेळी प्रत्यक्ष भेटून व पत्राद्वारे शहर वाहतूक शाखेच्या उपयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते.           तरी सुद्धा काम करणाऱ्या यंत्रणेने नागरिकांनी केलेल्या सूचनां कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने  याठिकाणी जीवितहानी देखील झालेली होती.दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होत असताना आज पुन्हा वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील  यांची भेट घेतली व कामाच्या ठिकाणी असलेल्या त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या


1)फूट ओव्हर ब्रिज च्या ठिकाणी इतर महामार्गावर लावत असलेल्या मोठ्या दिशादर्शक बोर्ड प्रमाणे फलक लावावेत


2) सध्या असलेले सदोष बोर्ड तातडीने काढून टाकण्यात यावे*


3) दुसऱ्या टप्प्याच्या कामात महामार्ग वाहतुकीसाठी बंद असताना कोपरी पुलावर एखादे अवजड वाहन बंद पडल्यास वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा.           याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली असून तातडीने त्रुटीं पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.परंतु लवकरात लवकर या त्रुटींची पूर्तता करून वाहन चालकांना दिलासा न दिल्यास,एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वाहतूक शाखेची असेल  असा इशारा काँग्रेसचे ओ. बी. सी. विभाग अध्यक्ष राहूल पिंगळे यांनी शेवटी दिला

Post a Comment

0 Comments