स्मशान भूमीतील बत्ती गुल झाल्याने मृतदेहा वरील अंत्य संस्कारासाठी विलंब
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कल्याणमध्ये रात्रीच्या वेळेस एका मृत महिलेच्या अंत्यविधीसाठी नागरीकांना स्माशन भुमीतील बत्ती गुल असल्याने ताटकळत उभे राहावे लागले.     कल्याण पूर्व भागातील विठ्ठलवाडी परिसरात मोक्षधाम ही स्मशानभूमी आहे. खडेगोलवली परिसरातील एका वयोवृद्ध महिलेचा मृ्त्यू झाल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक स्माशानभूमीत गेले. स्मशानभूमीतील बत्ती गुल झाली होती. स्मशानभूमीत एकच कर्मचारी उपलब्ध होता. त्याला विचारण्यात आले कीवीज का नाही. त्याच्याकडे उत्तर नव्हते. लोकांनी अंधारात महिलेच्या अंत्यविधीची प्रक्रिया सुरु केली. अर्ध्या तासानंतर त्याठिकाणी एक व्यक्ती आला. त्याने वीज पुरवठा सुरळित केला. या घटनेमुळे नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समाजसेवक राहूल काटकर यांनी याबात पत्राद्वारे आयुक्तांना कळवित स्माशनभुमीतील वीज पुरवठा कसा सुरळीत राहील याबाबत मागणी करीतनागरीकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे.


Post a Comment

0 Comments