गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी अर्बन सेलचे अनोखे आंदोलन


■सिलेंडरच्या पावती सोबत फोटो काढून सोशल मिडीयावर केले वायरल...

  

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डीझेल या इंधनांचे भाव दररोज वाढत असून गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून संसाराचा गाडा कसा चालवायचा असा मोठा प्रश्न गृहिणींसमोर उभा राहत आहे. त्यामुळे या गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. सिलेंडरच्या पावती सोबत फोटो काढून सोशल मिडीयावर हे फोटो पोस्ट करण्यात आले. राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांच्या संकल्पनेतून या आंदोलनाला सुरवात झाली असून सर्व सामान्य नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  केंद्र सरकार दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सातत्याने भाववाढ करत असुन आता तर हा दर ८८५ रुपये पर्यंत नेण्याचा विक्रम नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने केला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट नक्कीच कोलमडले आहे. हे सरकार जर केंद्रात अजुन काही वर्ष सत्तेत राहीले तर घरगुती गॅस सिलेंडर हे नक्कीच एक हजार रुपयांच्या वर जाईल आणि सर्वसामान्यांचे जगणे कठीण होईल. त्यामुळे ज्यांना या दरवाढीचा त्रास जाणवतो त्या प्रत्येकाने आपल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या पावती सोबत आपला फोटो सोशल मिडियावर पोस्ट करुन केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करावा असे आवाहन प्रविण मुसळे यांनी केले आहे. दरम्यान हे आंदोलन करताना राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे, कल्याण-डोंबिवली शहर समन्वयक अमोल लांडे, आनंद हजारे, अमित खोत हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments