Header AD

गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डच्या दरात ०.८ टक्क्यांची घसरण
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२१ : गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्ड ०.८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले, कारण प्रमुख अमेरिकन रोजगार डेटा (८ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी उशिरा आल्याने) येण्याअगोदर डॉलर मजबूत झाला, जे अमेरिकन फेडरल रिझर्वच्या आर्थिक धोरणास कमी करण्याच्या समयसीमेकडे इशारा करीत असल्याचे एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.       यूएस डॉलर आणि ट्रेझरी यील्ड प्रारंभिक यूएस साप्ताहिक बेरोजगार दाव्यांनंतर यूएस श्रम बाजारातील विकासाकडे इशारा करत कमी झाले. शिवाय, जागतिक आर्थिक उपक्रम पुन्हा सुरू होण्याबाबत पैज लावल्यानंतर तेलाच्या किंमतीतील वाढीने बाजारात धोका पत्करण्याच्या क्षमतेला बळ मिळाले, ज्यामुळे, सेफ हेवन सोन्यावर आणखी दाब पडला.     येत्या आठवड्यात सोने दबावाखाली राहू शकते, कारण, यूएसद्वारा निर्धारित कोणताही सकारात्मक आर्थिक डेटा कडक धोरणांकडे बेट वाढवेल आणि डॉलरला मजबूती देईल. व्याज वाढवण्याबाबत फेडच्या योजनेने सेफ हेवन गोल्डचा आउटलुक कमजोर केला.


   

     कच्चे तेल: डब्ल्यूटीआय क्रूड गेल्या आठवड्यात २.२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले कारण, जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा क्रियाकलाप सुरू झाल्यावर वाढत्या चिंतांनी तेलाची किंमत कमजोर करून टाकली. तेलाच्या किंमती वर वर जात आहेत, कारण ओपेकने उत्पादन गतीविधींमध्ये निर्धारित विस्तार चालू ठेवण्याची योजना केली आणि यूएस ऊर्जा विभाग इंधनाची वाढती मागणी आणि कमी पुरवठा असूनही आपातकालीन क्रूड, साठ्यातून काढण्यास तयार नव्हते. क्रूडसाठी लाभ मर्यादित झाला कारण, यूएस डॉलरमधील मूल्यवृद्धीने डॉलर मूल्यवर्गातील तेलास अन्य चलन धारकांसाठी कमी वांछनीय बनवले.         सतत दुस-या आठवड्यात यूएस क्रूड स्टॉक्सच्या वाढीनेही कच्च्या तेलाचा नफा मर्यादित ठेवला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्ट अनुसार, १ ऑक्टोबर २०२१ रोजी समाप्त होणार्‍या आठवड्यात यूएस क्रूड इन्व्हेंटरीमध्ये सुमारे २.३ मिलियन बॅरलची वृद्धी झाली. तेलाचा कमी पुरवठा आणि नैसर्गिक गॅसच्या वाढत्या किंमती या ओढाताणीत आर्थिक क्रियाकलापातील सुधार पाहता इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे आगामी आठवड्यात किंमती वाढू शकतात.

गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डच्या दरात ०.८ टक्क्यांची घसरण गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डच्या दरात ०.८ टक्क्यांची घसरण Reviewed by News1 Marathi on October 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads