राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्याचे कौतुक शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण दौऱ्यावर आलेल्या राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं असून विद्यार्थी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेत्तृत्वाखाली आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचित महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोली पासून सुरुवात झाली होती. २३, २४ आणि २५ ऑक्टोंबर हे तीन दिवस पालघर व ठाणे जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा मध्ये एकूण २४ विधानसभा क्षेत्रांचा जयंत पाटील आणि  ठाणे व पालघर  जिल्हा संपर्कमंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यात विद्यार्थी संघटनेचा जास्तीत जास्त सहभाग, कार्यकर्त्यांचा जास्तीत जास्त उत्साह दिसून आला. राष्ट्रवादीचे नेते जिथे जातील तिथे विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आणि त्यांचे स्वागत करत होते.यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात कोकण विभागातील विद्यार्थी कॉंग्रेसच्या संघटनात्मक कामाचे कौतुक केले. गेल्या वर्षभरात संघटना मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये विद्यार्थी कॉंग्रेस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे सुतोवाच केले. यावेळी किरण शिखरे यांच्या नेत्तृत्वाखाली भारतीय जनता पार्टीतील हितेश कापडणे आणि त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी अनेक पदनियुक्त्या देखील करण्यात आल्या. कार्यकर्त्यांचा उत्साह बघून येणाऱ्या काळात जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नेत्तृत्वाखाली ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये संघटना अधिक बळकट होईल. महाराष्ट्रभर परिवार संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीत तीन अंकी आकडा नक्कीच गाठेल यात काहीतरी मात्र शंका नाही. त्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कोकण विभागात हा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल. प्रत्येक बूथ लेव्हलला, वार्ड लेव्हलला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांच्या कौतुकांच्या शब्दांमुळे एक ऊर्जा मिळाली आहे. आणि तीच उर्जा कायम ठेवून आम्ही प्रत्येक संघटनेच्या घटकापर्यंत प्रत्येक समाजातील व्यक्तींपर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे कसे मिटवता येतील समाजाचे प्रश्न कसे मिटवता येतील याकडे आम्ही जास्त लक्ष देणारे असल्याचे किरण शिखरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments