निर्माणाधिन इमारतीचा लोखंडी रॅम्प पडल्याने ९ घरांचे नुकसान सुदैवाने जीवित हानी टळली

                       कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील बिर्ला काँलेज नजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या रूमवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रँम्प ९ रुमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले तसेच दोन रुमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने देवबलव्तर असल्याने जिवितहानी झाली नाही. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत.मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याण मधील बिर्ला कॉलेज नजीक कोकण वसाहत चाळ नं ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली  निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रँम्प् (परांची)  संध्याकाळी ८ च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्पराचे पत्रे फुटले मात्र जिवित हानी झाली नाही. वंदना शिर्केदिपक सुर्वेवसंती कदमदिंगबर चिंदरकरसंतोष सुर्वे दिलिपकुमार चव्हाणरजंना खरातजयनंद व्ही कुदंर, राजु उपाध्याययांच्या घराचे पत्रे तुटल्याने ऐन दसारा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले  आहेत. तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडेश्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्याचे पत्रे फुटले. या दोन्ही घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही.कोकण वसाहतीतील बांधित कुंटुबातील संतोष सुर्वे यांनी सांगितले कीइमारतीचे निर्माणधीन कामासाठी पारांती बांधली होती. काम बंद असुन मगंळवारच्या वार्यासह असलेल्या पावसात लोखंडी पाईपचा भाग कोसळल्याने आमच्या घराचे पत्रे फुटलेअसुन संसार उघड्यावर पडले. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेला आमचा घरगुती टिकल्या बनविण्याचा व्यवसाय आताच जरा जम बसला असताना घराचे पत्रे फुटल्याने ठप्प झाला आहे. तातडीने मदत मिळालीतर कसे बसे सावरता येईल."पत्रे फुटल्याने बांधित झालेल्या वदंना शिर्के यांनी सांगितले कीआमच्या कुटुंबात १२ सदस्य असुन  मी आणि नात घरात होतो. बाकी घराबाहेर गेले होते. जसा पत्रावर आवाज झाल्याने आम्ही तातडीने बाहेर पडलो म्हणून सुदैव तरी काही कुटुंबातील सदस्यांना पत्रे फुटल्याने मुका मार लागला आहे. पाऊस संपल्यानंतर या पडझडीत लाईट सुरू झाली. नशीबाने दोन चिमकुले विघुत शाँक् पासून तातडीने मदत केल्याने बचावली. आता आमचे संसार उघाड्यावर आले असुन पटेल बिल्डरच्या गेली काही वर्षापासून बंद असलेल्या कामाचा फटका आम्हाला बसला आहे. तरी आम्हाला तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.कल्याण तहसीलदार विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीघटनास्थळी पंचनामे करण्यासाठी पाठविले असुन पंचनामे जिल्हा आधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना मदत लवकर होईल याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.  तर "ब" प्रभागक्षेत्र आधिकारी जगताप यांनी घटनास्थळी बुधवारी अग्निशमन दलाच्या मदतीने पडलेले झाड काढण्याचे काम सुरू केले असे सांगितले.

Post a Comment

0 Comments