कल्याण एसटी डेपोत प्रवाश्यांचे हाल

 डोंबिवली ( शंकर जाधव )  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करावे, महागाई भत्ता द्यावेत, अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यानी राज्यभरात संप पुकारला. या पार्श्‍वभूमीवर आज कल्याणमधील एसटी डेपोमध्ये देखील कर्मचार्‍यांनी संप पुकारत काम बंद आंदोलन केले.       त्यामुळे कल्याण एसटी डेपोमधून सुटणाऱ्या एसटी गाड्या बंद झाल्या. मात्र राज्यातील इतर ठिकाणांहून येणाऱ्या बस मात्र सुरू ठेवण्यात आल्या होत्या. काही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी एसटी डेपोमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.          कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले एसटी डेपो मध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. कल्याण बस डेपोतून इतर ठिकाणी जाण्यासाठी जाणारे नागरिक मात्र सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी खोळंबले होते.

Post a Comment

0 Comments