शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

 

भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात 
शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत तो कायदेशीर करण्याचा प्रयत्न सर्व शेतकऱ्यांनी करावा जेणे करून या व्यसयावर अवलंबून शेतकरी व्यवसायिकांना भविष्यात कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही असा निर्णय नुकताच भिवंडी येथे कोकण विभागीय विट उत्पादक मालक संघटनेचे अध्यक्ष कुंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित वीटभट्टी मालकांच्या बैठकीत घेण्यात आला .


       

           याप्रसंगी मोठ्या संख्येने वीटभट्टी मालक उपस्थित होते.
वीटभट्टी मालकांना अवकाळी पाऊस यांसह स्थलांतरीत मजूर यांच्या कडून केल्या जाणाऱ्या तक्रारी, महसूल विभागा कडून केल्या जाणाऱ्या कारवाया यांमुळे वीटभट्टी चालक बेजार झाला असल्याने वीटभट्टी मालकांनी आपला व्यवसाय आधुनिकतेची जोड देत पारदर्शक व्यवहार करण्याची ,मजुरांचे श्रमिक कार्ड बनविणे त्यांची नोंद कामगार कार्यालयात करणे ,वीटभट्टी मालक  जसे भूमिपुत्र व्यवसायिक आहोत तसेच मजूर हे सुध्दा आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र आदिवासी बांधव आहेत .
           या भावनेतून मजुरांशी सुध्दा आपण प्रेमाचे संबंध ठेवण्याचा निर्णय घेऊन वीटभट्टी व्यवसाय आधुनिकतेची जोड देत कामगारांचे हित जपत करण्याचा निर्णय घेण्यात आला  असे शेवटी कुंदन पाटील यांनी स्पष्ट केले .या बैठकीत भिवंडी तालुक्यातील सुमारे दोनशे वीटभट्टी मालक उपस्थित होते ज्यांनी विचारलेल्या प्रश्नांना संघटनेच्या माध्यमातून उत्तर देत त्यांचे समाधान करण्यात आले

Post a Comment

0 Comments