विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचा केडीएमसीवर मोर्चा थकीत रक्कम त्वरित देण्याची केली मागणी
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : आपल्या विविध मागण्यांसाठी गट प्रवर्तक व आशा सेविकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर धडक देत मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या माध्यमातून हा मोर्चा काढत शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या विविध थकीत रक्कमा त्वरित देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.   


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना मध्यवर्ती सरकारकडून देण्यात येणारे माहिती अहवाल अचूक संकलनाचे दरमहा दोन हजार रुपये एप्रिल २०२९ पासुन दिले गेले नाहीतते त्वरीत देण्यात यावेत. राज्य सरकारने १७ जुलै २० च्या शासन आदेशानुसार गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये व आशा स्वयसेविकांना दोन हजार रुपये मानधनवाढ केली आहे. रक्कम मार्च २०२१ पर्यत देण्यात आली आहे. एप्रिल २०२१ पासून ही मानधनवाढ आजपर्यंत दिली नाही. ती ताबडतोबीने देण्यात यावी.राज्य सरकारने ९ सप्टेंबर २०२१ च्या शासन आदेशानुसार १ जुलै २०२१ पासून गटप्रवर्तकांच्या मानधनात बाराशे रुपये व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात एक हजार रुपये  वाढ केली आहे. कोरोना महामारी असेपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दरमहा ५०० रुपये कोरोना भत्ता देण्याचे मान्य केले आहे. ही रक्कम गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना ताबडतोब देण्यात यावी.कल्याण डोंबिवलीमध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मागील वर्षी दिवाळी भाऊबीज दोन हजार रुपये  महानगरपालिकेने जाहीर केले होतेती रक्कम आजपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना देण्यात आली नाही. ही रक्कमही आशा स्वयंसेविकांना यावर्षी देण्यात यावी व या दिवाळीला गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना १० हजार रुपये  दिवाळी भाऊबीज (बोनस) देण्यात यावे. तसेच मोबाईल रिचार्जचे पैसे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दिले गेले नाहीते थकबाकीसह देण्यात यावे. आशा स्वयंसेविकांना ज्या कामाचा मोबदला नाहीते काम सांगू नये किंवा मोबदल्याविना काम देऊ नये. या व इतर मागण्यांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मोर्चा काढला असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष भगवान दवणे यांनी सांगितले.

Post a Comment

2 Comments