होली एंजल शाळा व्यवस्थापन कॉलेज सुरू करण्यासाठी सज्ज !

डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. परिणामी शाळा-कॉलेज बंद झाली. मात्र आता शासनाच्या निर्देशानुसार शाळा-कॉलेज सुरू होत आहेत. मागील आठवड्यात शाळा सुरू झाल्या.२० ऑक्टोबर ला कॉलेजही उघडली जाणार आहेत. याचाच भाग म्हणून पूर्वेकडील होली एंजल शाळा-कॉलेज व्यवस्थापनाने यासाठी पूर्ण तयारी केली असून शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी भव्य स्वागत करणार आहेत.
             याबाबत होली एंजल शाळा-कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक बियॉन डेव्हिड यांनी सांगितले की, आमच्या येथे शाळा आणि कॉलेज मिळून सुमारे २३०० विद्यार्थ्यांना शालेय व कॉलेज शिक्षण दिले जाते. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केले आहे. ऑनलाइन सेवेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन कोरोना काळातही विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले.
             आता शाळा-कॉलेज मध्ये येणारा विद्यार्थो कोरोना प्रतिबंधसाठी मास्क, सॅनिटायझेशन आणि योग्य अंतर ठेवून शाळेत येतील. सर्व जण सुरक्षेची काळजी घेणार असून आमचे शिक्षकही कोरीव प्रतिबंधी लसीकरणा चे दोन डोस पूर्ण केलेले असतील. विशेष म्हणजे आमच्याकडे ऑफलाईन, ऑनलाईन अशा विविध प्रकारे शिक्षक वर्गात शिकविणार आहेत. जे विद्यार्थी हजर राहून शकणार त्यांनाही शिक्षणाचे धडे मिळणार असल्याने आमच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान नाही.

Post a Comment

0 Comments