राज्यातील ४९ व्यक्तींना कृत्रिम पायाचा लाभ, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ न्यु कल्याण यांच्या वतीने अभिनव उपक्रम
ठाणे , प्रतिनिधी  :  रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ न्यु कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत पाय बसवण्याकरिता आवाहन केले गेले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिनांक ३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेतलेल्या कॅम्पमध्ये ४९ जणांची नोंदणी केली गेली व त्यांच्या पायांची माप घेण्यात आली. यामुळे दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी या सर्व लाभार्थींना ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कृत्रिम पाय बसवून चालण्याचा सराव करून घेतला गेला.            यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष  रोटेरियन सुनिल सोमण, सचिव रोटेरियन मेधा जोशी, डॉ.मोहन चंदावरकर, महेश गुप्ते, पल्लवी फौजदार, राजेश परांजपे,देवयानी वेद, सुरेश कनाकीया, डॉ.प्रतिक, राधिका तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे रोटेरियन डॉ.सुश्रुत वैद्य, रोटेरियन किरण पाटील, नामदेव चौधरी, बिजू उंनिथन, विरेंद्र सिंग, राजेश परदेशी आणि अध्यक्ष नितीन माचकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments