सोमवारच्या बंदमध्ये रिपाइं एकतावादी सक्रीय सहभागी होणार
ठाणे (प्रतिनिधी)  - उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकर्‍यांना चिरडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारलेल्या बंदमध्ये रिपाइं एकतावादी सक्रीय सहभाग नोंदविणार असल्याचे रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले. 

 

 

         उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकर्‍यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदचे समर्थन रिपाइं एकतावादीने केले आहे.          शेतकरी हा देशाचा आत्मा आहे आणि हा आत्माच मारला जाणार असेल तर रिपाइं एकतावादी कधीही सहन करणार नाही. शेतकर्‍यांना अमानुषपणे चिरडणार्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. त्यामुळेच या बंदमध्ये राज्यभरातील रिपाइं एकतावादीचे कार्यकर्ते सक्रीय सहभागी होणार आहेत, असेही नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले. 


     

         दरम्यान, जनतेनेही आपल्या पोशिंद्याच्या समर्थनार्थ उत्स्फूर्तपणे बंद पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments