आठ दिवस न थांबता,दिवाळीच्या तोंडावर दिवावासीयांची घरे तोडायला प्रशासनास कुणी सांगितले? याचे उत्तर रमाकांत मढवी यांनी जनतेला द्यावे - रोहिदास मुंडे
ठाणे , दिवा , प्रतिनिधी  :-  ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवा स्टेशन परिसरातील रहिवाशांना बेघर करण्यात आले.ठाणे महापालिका प्रशासनाला दिवाळीच्या तोंडावर कारवाई करण्यास कुणी भाग पाडले याचे उत्तर दिव्याचे सत्ताधारी नेते म्हणून माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी जनतेला द्यावे असे आवाहन भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केले आहे.


          दिव्यात पालिकेने रस्ता रुंदीकरण च्या नावाखाली ऐन दिवाळीच्या तोंडावर रस्त्यावर आणले आहे.दिव्यात शिवसेनेचे आठ नगरसेवक आहेत. पालिकेत त्यांची सत्ता असताना माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिवाळी सणाच्या तोंडावर कारवाई थांबविण्याची विनंती प्रशासनाला करायला हवी होती.दिवाळीत घरांवर बुलडोझर फिरवू नका असे मढवी यांनी महापौरांना का सांगितले नाही.दिव्यात आठ नगरसेवक असले तरी मढवी हे त्यांचे नेते आहेत आणि प्रशासन हे मढवी यांच्या सूचना ऐकते अशी आमची माहिती आहे.


         दिव्यासाठीचा निधी असो किंवा  दिव्यात घडणाऱ्या प्रत्येक विकासाच्या गोष्टीचे श्रेय माजी उपमहापौर रमाकांत मढवी घेत असतात,मग दिवाळी सणाच्या तोंडावर लोकं बेघर झाली त्याचे श्रेय पण ते घेणार आहेत का?असा प्रश्न रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.दिवाळी जवळ आली असताना त्या इमारतींवर बुलडोझर फिरण्यास कोणी सांगितले हे मढवी यांनी दिव्यातील जनतेला सांगायला हवे.


            आठ दिवस थांबून नंतर कारवाई करता आली असती.दिवाळी नंतर लोकांनींस्वतःहुन घरे खाली केली असती मात्र येन दिवाळीत लोकांना बेघर करण्यास प्रशासनाला कुणी सांगितले हे जाणून घेण्याचा अधिकार येथील जनतेला आहे,दिव्याचे सत्ताधारी नेते म्हणून त्यांनी ही माहिती लोकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments