भिवंडीत स्टेम प्राधिकरणा कडून अनधिकृत नळ जोडणीवर पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू...

भिवंडी दि 8(प्रतिनिधी ) भिवंडी ,ठाणे व मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रासह भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रास पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणा कडून भिवंडी पालिका सह ग्रामपंचायत क्षेत्रातील अनधिकृत नळ जोडणी वर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून त्यामुळे या पाण्यावर आर्थिक हित साध्य करणाऱ्यां मध्ये खळबळ उडाली असून कारवाई यापुढे ही सुरू राहणार असल्याचे संकेत स्टेम प्राधिकरणाने दिले आहेत. भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्टेम प्राधिकरणा कडून दररोज एक एम एल टी पाणीपुरवठा केला जातो .
          परंतु ही पाईप लाईन भिवंडी शहरातील  ज्या भागातून जात आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ जोडणी झाल्याने या ग्रामस्थांना कमी दाबाने अत्यल्प असा पाणी पुरवठा होत असल्याने कित्येक वर्षे या बाबत संघर्ष करून ही या परिस्थितीत बदल न झाल्याने ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत दाद मागितली असता न्यायालयाने पाणी ही प्रत्येकाची गरज असून ते त्यांच्या पर्यंत पोहचविण्याची व त्या ठिकाणी होत असलेली पाणी चोरी रोखण्याची जबाबदारी स्टेम प्रशासनाची असल्याचे स्पष्ट केल्या.
            नंतर स्टेम प्रशासनाला खडबडून जाग आली असून मागील आठ दिवसां पासून खोणी ,काटई,कांबे या ग्रामपंचायत क्षेत्रासह भिवंडी पालिका हद्दीतील मिल्लत नगर ,नवीबस्ती,
फेणापाडा, कामतघर ,नारपोली या भागात मोठा पोलीस फौजफाटा घेऊन कारवाईस सुरवात केली आहे .आता पर्यंत झालेल्या कारवाईत तब्बल 310 नळ जोडणी तोडण्यात आल्या असून या कारवाईत स्टेम प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी ,पालिका कर्मचारी यांसह शेकडो पोलीस सहभागी होत आहेत.

Post a Comment

0 Comments