मुंबई रेल्वे पोलिसांच्या गाडीला लागली आग आगीत गाडी जळून खाक; सुदैवाने जीवित हानी नाही
कल्याण , कुणाल  म्हात्रे  कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात मुंबई रेल्वे पोलिसांच्या गाडीने पेट घेतल्याची घटना घडली. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई रेल्वे पोलिसांची व्हॅन कल्याण शीळ रोड काटई नाका येथून कल्याणच्या दिशेने येत होती. या व्हॅन मध्ये गाडी चालकासह आरपीएफचे तीन जवान होते. याच दरम्यान गाडीला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ गाडीबाहेर पळ काढला. त्यामुळे तिघे ही सुखरुप बचावले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं. आगीमुळे जणू फटाके फुटल्याचे आवाज येत होते.आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र या आगीत व्हॅनचे मात्र नुकसान झाले. या दरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या गाडीत फटाके असल्याची माहिती व्हिडिओतून समोर आली असून पोलीस या गाडीतून फटाके कशासाठी घेऊन जात होते यासंदर्भात कळू शकले नाही.

Post a Comment

0 Comments