Header AD

ठाणे जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूंची गगन भरारी कर्नाटक येथील स्पर्धेमध्ये केला जागतिक विक्रम




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कर्नाटक येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील एरोलीच्या ३ बाल खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत स्केटिंग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे ९ रेकॉर्ड प्रस्थापित केले. ऐरोलीच्या स्केटिंग अकादमी ऑफ इंडियाच्या लायशा अगरवाल सीआ अगरवाल व रेयांश असमल्लू या  ६ वर्षाच्या ३  स्केटिंग खेळाडूंनी सलग न थांबता ८१ तास स्केटिंग करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.



 या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, राष्ट्रीय रेकॉर्ड, वैश्विक रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड यांनी घेतली आहे. या रेकॉर्ड बद्दल बोलताना लायशा अग्रवाल हिने सागितले की स्केटिंग ट्रॅक आणि विविध राज्यांच्या स्केटर्सना भेटणे आणि त्यांच्याबरोबर स्केटिंग करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा अनुभव होता. तर प्रशिक्षक मोहित बजाज यांनी स्केटिंग ही संपूर्ण शरीराची कसरत आहे आणि ती एकाग्रतेची चांगली पातळी देखील विकसित करते आणि मुलांना तंदुरुस्त ठेवते म्हणून मुले स्केटिंग कडे वळत आहेत असे सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूंची गगन भरारी कर्नाटक येथील स्पर्धेमध्ये केला जागतिक विक्रम ठाणे जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूंची गगन भरारी कर्नाटक येथील स्पर्धेमध्ये केला जागतिक विक्रम Reviewed by News1 Marathi on October 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads