ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्या वरील दुर्गाडी माता मंदिराची दारे भावीकांसाठी खुले
कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण खाडी किनारी छञपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा दुर्गाडी किल्ला आहे. याचं किल्ल्यावर असलेले दुर्गाडी मातेचे मंदिर हे जागृत देवस्थान असल्याची भक्तांची भावना आहे. नवरात्रीच्या काळात कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर कल्याणच् नव्हे तर  ठाणे जिल्ह्यातून दुर्गाडी देवीच्या दर्शनसाठी  भक्ताची गर्दी होते. घटस्थापनेपासून ते दसर्या पर्यत मंदिरात मोठा उत्सव भरतो.           मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे मंदिरे बंद होती. त्यामुळे भक्तांना दर्शन घेता येत नव्हते. आजपासून मंदिरे भाविकांना दर्शनसाठी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर दुर्गाडी मातेच्या मंदिरात देवीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात अली आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते देवीची पूजा करण्यात आली असून यावेळी परिवहन समिती सदस्य सुनील खारूक यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.         या मंदिरात देखील  देवीच्या दर्शनासाठी भक्त सकाळपासून येत आहेत कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जात आहे. तर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments