मुरबाड मधील उत्कृष्ट दर्जासारखे रस्ते कल्याण –डोंबिवली का बनत नाहीत ? शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा प्रश्न


 डोंबिवली ( शंकर जाधव ) `डोंबिवली शहरातील रस्त्यावर खड्डे` हे नागरिकांच्या चर्चेला विषय बनला आहे.खड्ड्यामुळे वाहनचालक जखमी होत असून राजकीय पक्षांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.`खड्डे मुक्त रस्ते` बनवण्यासाठी पालिका प्रशासन कमी पडत असल्याने मुरबाडमधील उत्कृष्ट दर्जासारखे  रस्ते कल्याण –डोंबिवली का बनत नाहीत ? असा प्रश्न शिवसेनेच्या माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे.           डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील स्टार कॉलिनी जुना जकात नाका ते आईस फॅक्ट्ररी पर्यतच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने रस्त्यावर डांबरीकरण केले होते.पालिकेच्या या निकृष्ट दर्ज्याच्या कामाबाबत पाटील यांनी  नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे माजी नगरसेवक पाटील यांनी या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.             मुरबाडच्या रोड प्रमाणे काम केले पाहिजे असे सांगून ठेकेदारामुळे नाहक नागरिकांना त्रास होत आहे. काम करतांना डांबर कमी वापरल्यामुळे खडी मोकळी झाली आहे. दर्जेदार रस्ते का होत नाहीत याकडे प्रशासनाने पाहिले पाहिजे असे पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments