Header AD

क्विक हीलने प्रमुख सुरक्षा उत्पादनांची नवी आवृत्ती सादर केली ग्राहकांच्या डिजिटल गोपनीयतेचे संरक्षण करण्यावर भर ~
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२१ : सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीची कंपनी क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या उपभोक्त्यांसाठी आपल्या प्रमुख सुरक्षा उत्पादनांची एक नवी आवृत्ती आणली आहे. या नव्या आवृत्तीत कंपनीने आपल्या सध्याच्या फीचर्समध्ये अनेक नवी फीचर्स दाखल करून काही सुधारणा केल्या आहेत. या नवीन फीचर्समध्ये नव्या युगाच्या उपभोक्त्यांसाठी त्यांच्या डिजिटल गोपनीयतेचे संरक्षण करण्यावर मुख्य भर देण्यात आला आहे.        या नवीन आवृत्तीतील डेटा ब्रीच अलर्ट फीचर मुख्य हायलाइट आहे. जर ईमेल आयडी, पासवर्ड, फोन नंबर आणि आयपी अॅड्रेस सारख्या उपभोक्त्याच्या वैयक्तिक डेटाबाबत ऑनलाइन अतिक्रमण किंवा छेडछाड झाली, तर उपभोक्त्याला त्याबाबत तत्काळ धोक्याची सूचना हे फीचर देईल तसेच उपाययोजना करण्यास मदत करेल.        डेटा ब्रीच अलर्ट व्यतिरिक्त यात अॅंटी-ट्रॅकर आणि वेबकॅम संरक्षण फीचर्सचा देखील समावेश आहे. अॅंटी-ट्रॅकर फीचर यूझर्सच्या मागावर राहून माहिती गोळा करणार्‍या ट्रॅकर्सना ब्लॉक करून यूझर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करते. वेबकॅम संरक्षण यूझर्सच्या परवानगीशिवाय वेबकॅम अॅक्सेस करण्यापासून अॅप्लीकेशन्स आणि मालवेअरला रोखते. या फीचरमुळे विश्वासार्ह नसलेल्या अॅप्लिकेशन्स यूझर्सचे व्हिडिओ किंवा छायाचित्रे घेऊन तो कंटेन्ट बाहेरच्या जगात पाठवू शकत नाहीत आणि अशा प्रकारे त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण होते.           या ब्रॅंडची नवीन उत्पादने अशा प्रकारे बनवली आहेत की ती उपभोक्त्यांना त्यांच्या ऑनलाइन गोपनीयतेची काळजी घेण्यास सक्षम बनवतात आणि अशा प्रकारे इंटरनेटवर सर्फिंग करताना त्यांना संपूर्ण डिजिटल स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा देतात. यातील अनोख्या अशा डेटा ब्रीच अलर्ट फीचरव्यतिरिक्त वेबकॅम सुरक्षा, अॅंटी-ट्रॅकर, अॅंटी रॅनसम, फिशिंग सुरक्षा व इतर सोल्युशन्सच्या श्रेणीतून या ब्रॅंडने उपभोक्त्याची सुरक्षा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे.         क्विक हीलच्या मुख्य उत्पादन व्यवस्थापक, स्नेहा काटकर म्हणाल्या, “जगभरात डेटा भंगाच्या झपाट्याने वाढत चाललेल्या घटनांमुळे उपभोक्ता सुरक्षा अगदी मूलभूत अॅंटीव्हायरस सुरक्षेपासून विकसित होत होत आता अधिकाधिक गोपनीयता-केंद्रित होत चालली आहे. क्विक हीलमध्ये आम्ही उपभोक्त्याच्या सुरक्षेला नेहमीच आमच्या मिशनच्या केंद्रस्थानी ठेवले आहे आणि अशी उत्पादने बनवली आहेत, जी त्यांना डेटा भंगाच्या धोक्यापासून आणि इतर मालवेअर हल्ल्यांपासून वाचवतील.         आमच्या अधिक गोपनीयता-प्रेरित अशा या नवीन उत्पादनात अनेक प्रगत फीचर्स आहेत, जशी की डेटा ब्रीच अलर्ट, अॅंटी ट्रॅकर, वेबकॅम प्रोटेक्शन, सेफ बँकिंग आणि इतर बरीच. आम्हाला ठामपणे असे वाटते की, अशी मजबूत सुरक्षा सोल्युशन्स विकसित करून आणि डिलिव्हर करून आणि त्यांच्याबद्दलची जागरूकता वाढवून आम्ही आमच्या उपभोक्त्यांसाठी सुरक्षित आणि संरक्षित डिजिटल जीवन सुनिश्चित करू शकतो, जेथे ते इंटरनेट आणि त्याच्या ऑफरिंग्सचा उपयोग आणि अनुभव अधिक निःशंकपणे आणि विनासायास घेऊ शकतील.”

क्विक हीलने प्रमुख सुरक्षा उत्पादनांची नवी आवृत्ती सादर केली ग्राहकांच्या डिजिटल गोपनीयतेचे संरक्षण करण्यावर भर ~ क्विक हीलने प्रमुख सुरक्षा उत्पादनांची नवी आवृत्ती सादर केली ग्राहकांच्या डिजिटल गोपनीयतेचे संरक्षण करण्यावर भर ~ Reviewed by News1 Marathi on October 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads